भुईबावडा घाटात ‘ती’ गटारात कोसळलेली दरड जैसे थे!

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

ठिकठिकाणी पडझड सुरूच; पावसाची रिपरिप सुरूच

वैभववाडी/पंकज मोरे, ता. २९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस संततधार कोसळणा-या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. या कोसळणा-या धो-धो पावसाने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. गटारी तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. आठ दिवसापूर्वी कोसळलेली दरड गटारातच असल्याने रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे. अद्यापही दरड हटविण्यात न आल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यावर्षी पहिल्याच पावसात भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू झाल्या आहेत. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत अनेकदा घाट रस्त्यांवर दरडी, दगड, झाडे उन्मळून कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. सलग दोन दिवस तालुक्यासह जिल्हात धुवाधार पाऊस कोसळत आहे. भुईबावडा-रिंगेवाडीपासून सुमारे ५. कि. मी. अंतरावर गटारात कोसळलेली दरड अद्यापही सा. बां. ने हटविली नाही. यापूर्वीच बांधकाम विभाकडून जेसीबी व डंपर घाटात कायम ठेवणार असे सांगण्यात आले होते. मात्र, ‘ना घाटात डंपर ना जेसीबी’ सा. बां. च्या गलथान कारभाराबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घाटात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
सलग दोन दिवस पाऊस धुवाधार कोसळत असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. घाटमार्गातील गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. पावसाळ्यात भुईबावडा व करूळ घाटांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. घाटातील संरक्षण कठडेही अनेक ठिकाणी कोसळलेल्या स्थितीत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास दरडी कोसळण्याची दाट संभवना वर्तविली जात आहे.

\