दोडामार्गातील मराठा बांधवांची मागणी…
दोडामार्ग, ता.२९: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील धुरी कुटुंबीयांवरील खोट्या अँट्रासिटि केस प्रकरणाविरोधात आज दोडामार्ग तालुक्यातील मराठा बांधवांनी अँड.सोनू गवस यांच्या नेतुत्वाखाली दोडामार्ग तहसीलदार व पोलिसांना निवेदन दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व धुरी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीची केस दाखल करण्यासाठी मागणी काही मागासवर्गीय संघटनांकडून केली जात आहे.हे चुकीचे आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अँड. श्री सोनू गवस, सुर्यकांत गवस, बाळा गवस, उदय पास्ते, वैभव ईनामदार, संदेश गवस, संदिप गवस, रामकृष्ण दळवी, संदिप घाडी, सुरेश सावंत, सुदेश मळीक, गणेशप्रसाद गवस आदि उपस्थित होते.