रास्त धान्य दिले जात नसल्याने दोडामार्ग तालुक्यात नाराजी

142
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मनसे शहराध्यक्ष अभिजीत खांबल यांच्याकडून डिजिटल सेवेवर प्रश्नचिन्ह

दोडामार्ग, ता.२९: मुसळधार पावसामुळे तालुक्यात दुरध्वनीची इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील रास्त धान्य दुकानावर गेले दोन दिवस रास्त धान्य दिले जात नसल्याने तालुक्यात नाराजी आहे. दोडामार्ग शहरात हाकेच्या अंतरावर रास्त दुकान असुनही प्रशासन लक्ष देत नाही. इंटरनेट सेवेअभावी धान्य देऊ शकत नाही असे सांगितले जात आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष अभिजीत खांबल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी डिजिटल सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आँफलाईन पुर्वीप्रमाणे धान्य वितरीत करावे अशी मागणी केली आहे.

\