प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक अध्यापक संघाचे धरणे आंदोलन

2

सिंधुदुर्गनगरी,ता.२९: माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पांडुरंग काळे, माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदि उपस्थित होते.
शासनाचे अनुदानीत, विनाअनुदानित, खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी याबाबत धारसोडीचे अवलंबलेल्या शैक्षणिक धोरणा विरोधात तसेच शिक्षक, विद्यार्थी विरोधी भूमिकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र नाराजी व असंतोष वाढला आहे. शासनाची या शिक्षक व विद्यार्थी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच विविध योजनांकडे लक्ष वेधन्यासाठी जिप समोर धरणे आंदोलन छेडले.

4