अखिलेश कोरगावकर सावंतवाडी भाजपा युवा शहर अध्यक्षपदी निवड

510
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. २९ : येथील उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांचे सुपुत्र अखिलेश कोरगावकर यांची सावंतवाडी भाजपा युवा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी श्री. चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर, अन्नपूर्णा कोरगावकर आदी उपस्थित होते. श्री. अखिलेश गेले अनेक दिवस सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कामाला सुरुवात केली होती. आपले पिताश्री प्रसाद कोरगावकर यांच्याकडून सामाजिक कामाचा वसा त्यांनी घेतला आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आधी विविध कामे करण्याबरोबरच युवकांची फळी त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे असे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

\