Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यालाचखोर तहसीलदार व लिपिकाला न्यायालयीन कोठडी

लाचखोर तहसीलदार व लिपिकाला न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्गनगरी, ता. २९ : वृक्षतोडीसाठीच्या मालकी हक्क दाखल्यासाठी ६ हजारांची लाच घेणाऱ्या कणकवली तहसीलदार संजय पावसकर आणि २ हजारांची लाच घेणाऱ्या महसूल लिपिक निलेश कदम या दोघांना येथील विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कणकवली शहरातील लाकूड व्यावसायिक असलेल्या फिर्यादीने आपल्या वृक्षतोडीसाठी मालकी दाखला मिळण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. मात्र यासाठी तहसीलदार संजय पावसकर आणि महसूल लिपिक निलेश कदम यांनी फिर्यादीकडे लाच मागितली होती. याबाबत फिर्यादी लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची खात्री केल्यानंतर बुधवार दि. २६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली तहसील कार्यालयात सापळा रचून तहसीलदार व लिपिक यांना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी तहसीलदार संजय पावसकर आणि लिपिक नीलेश कदम यांना २७ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायल्याने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments