करुळ भट्टीवाडी येथे घराची भिंत कोसळली

275
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी, ता. २९ : सलग दोन दिवस धो-धो कोसळणा-या पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे. या पावसामुळे करुळ-भट्टीवाडी येथील शांताराम बाबू कदम यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.
तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पडणा-या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतीची कामेही खोळंबली होती. या पडणा-या मुसळधार पावसाने करुळ भट्टीवाडी येथील शांताराम बाबू कदम यांच्या घराची दगडी भिंत कोसळून सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

\