पक्ष विस्तारासाठी आता जोमाने काम करा – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

141
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२९ : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत फक्त कणकवली येथेच पक्षाचे स्वमालकीचे कार्यालय निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजप पक्ष विस्तारासाठी आता कार्यकर्त्यांनी जोमाने काम करा असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
कणकवली शहरातील भाजपच्या स्वमालकीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, रवींद्र शेटये, बबलू सावंत आदी उपस्थित होते.
आमदार प्रसाद लाड यांनी जिल्ह्यात भाजपची स्वमालकीची वास्तू उभी राहण्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचे महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने सांगितले. तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे. जिल्ह्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील असा विश्‍वास व्यक्त केला.