वेंगुर्ले : ता.३० आधार फाउंडेशन वेंगुर्ला व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १४ वयोगटासाठी बालनाट्य प्रशिक्षण शिबीर आज दिनांक ३० जून रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत आदर्श कृषी पर्यटन केंद्र कॅम्प वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ रंगकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, संजय पुनाळेकर, रमेश नार्वेकर, प्रदीप कुबल आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वेंगुर्ला शहरातील तसेच तालुक्यातील ५० मुलामुलींनाच यात प्रवेश दिला जाणार असून अभिनयातील बारकावे, हावभाव, सादरीकरण, स्टेजवरील वावर व संवाद फेक यावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या विषयी अधिक माहितीसाठी श्री नंदन वेंगुर्लेकर (9422434356) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आधार फाउंडेशन अध्यक्ष श्रीमती माधुरी वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
Sid, [30.06.19 22:38]
[ Photo ]