तळे भरले काठोकाठ……

2

सावंतवाडीचा मोती तलाव:नागरीकांतुन समाधान…

सावंतवाडी ता.३०: गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील मोती तलाव काठोकाठ भरून संस्थानकालीन सांडवा ओसंडून वाहू लागला आहे.त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेले दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे.तर काही ठिकाणी पड झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.या वर्षीच्या उन्हाळ्यात येथील मोती तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात आटले होते.तर शहरालगतच्या काही भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.यावर्षी पावसाने उशिरापर्यंत पाठ फिरवल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता होती.मात्र दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सर्वांना तृप्त करून सोडले आहे.

14

4