सावंतवाडीत “२५” हजाराची भव्य भजन स्पर्धा

755
2
Google search engine
Google search engine

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा निरीक्षक अर्चना घारे यांचे आयोजन

सावंतवाडी ता.३०: येथिल सावंतवाडी राष्ट्रवादीच्या विधानसभा पक्षनिरिक्षक सौ.अर्चना घारे यांच्यावतीने विधानसभा मतदार संघातील भजन प्रेमींना खास पंचविस हजाराचे बक्षिस मिळवून देणारा भव्य भजन स्पर्धा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.ही स्पर्धा १३ जुलै पासून २० जुलै या काळात होणार असून याचा महाअंतिम सोहळा ता २१ जुलैला होणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात सावंतवाडी वेगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील भजन प्रेमींना याचा लाभ घेता येणार आहे.
प्राथमिक फेरी शनिवार ता १३ जुलैला राष्ट्रोळी मंदीर दोडामार्ग येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.या स्पर्धेचे उदघाटन अर्चना घारे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी जिल्हा बॅकेचे उपाध्क्ष सुरेश दळवी उपस्थित राहणार आहेत .दुसरी फेरी १४ जुलै रोजी श्री देव रामेश्वर मंदीर वेगुर्ला येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.या स्पर्धेचे उदघाटन अर्चना घारे यांच्याहस्ते होणार आहे.यावेळी राष्ट्रवादीच महीला जिल्हाध्क्षा नम्रता कुबल उपस्थित राहणार आहेत.
तिसरी फेरी शनिवार ता.२० जूलैला सावंतवाडी येथिल बॅ.नाथ पै सभागृहात होणार आहे.याचे उदघाटन सौ.घारे यांच्याहस्ते होणार आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्क्ष सुरेश गवस उपस्थित राहणार आहेत.तर या स्पर्धेची महाअंतिम फेरी २१ जुलैला सावंतवाडी येथिल बॅ नाथ पै सभागृहात होणार आहे.याचे उदघाटन माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्याहस्ते होणार आहे.यावेळी माजी जिल्हाध्क्ष व्हीक्टर डान्टस उपस्थित राहणार आहेत.दरमन या स्पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी अनुक्रमे प्रथम पाच हजार, व्दीतीय तीन हजार आणी तृतीय दोन हजार व उत्तेजनार्थ तर महाअंतिम फेरीसाठी प्रथम पंचविस हजार व चषक,व्दीतीय पंधरा हजार व चषक व तृतीय दहा हजार चषक तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे देणत येणार आहेत.या स्पर्धेत जास्तीत जास्त भजन प्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ.घारे यांनी राष्ट्रवादीच्यावतीने केले आहे.