भुईबावडा, करुळ घाट ‘हाऊसफुल्ल

2

 

विशेषतः भुईबावडा घाटात पर्यटकांची धाव; पावसाची रिपरिप सुरूच

वैभववाडी/पंकज मोरे, ता.३० : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या निसर्गरम्य भुईबावडा व करुळ घाटातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. नैसर्गिक मनमुराद आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांना मोहिनी घालणारा भुईबावडा व करुळ घाटमार्गाची ओळख आहे. त्यामुळे घाटातील पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची धाव या घाटमार्गाकडे वळत आहे.
तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भुईबावडा व करुळ घाटातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. हिरव्यागार पर्वतरांगा त्यावर पांघरलेल्या धुक्याचा दाट थाट, उंच कड्याकपारीतून खोल दरीत कोसळणारे धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगेतून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता. घाटामार्गातून अंगाला फडफड झोंबणारा वारा, त्यातूनच अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी या सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दोन्ही घाटात येत आहेत. विशेषतः तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

4