भुईबावडा घाटात दरड कोसळली

180
2
Google search engine
Google search engine
Google search engine

घाट मार्गातील वाहतूक विस्कळीत; पावसाचा जोर कायम

वैभववाडी, ता.३०: तालुक्यात सलग तीन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसाने दाणादाण उडविली आहे. शनिवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात दरड कोसळली. यामुळे गगनबावडा-खारेपाटण राज्यमार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.
आठ दिवसापूर्वीच रिंगेवाडीपासून ५. कि. मी. अंतरावर दरड गटारात कोसळली होती. मात्र ही दरड बांधकामने अद्याप हटविली नाही. त्याच ठिकाणी शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली. या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.

\