शिक्षक कै.संजय कदम सर यांना सर्व शिक्षक संघटनांकडून श्रद्धांजली

2

 

वेंगुर्ले, ता. ३० : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, प्राथ.शिक्षक पतपेढीचे माजी संचालक, मुख्याध्यापक संघाचे राज्य पदाधिकारी, जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, आदर्श शाळा तळेरे नं. १ चे सेवाभावी मुख्याध्यापक संजय भगवान कदम सरांचे दि २४ जून २०१९ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली देण्यासाठी आज सर्व संघटना पदाधिकारी व प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्राथ. शिक्षक पतसंस्था, सिंधुदुर्गनगरी येथे अभिवादन सभा घेण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री. राजाराम वरुटे, जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ निसरड, माजी जिल्हा शिक्षण समिती सदस्य संजय बगळे, अखिल भारतीय प्राथ. शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष के. टी. चव्हाण, महा. राज्य. प्राथ. शिक्षक समितीच्या राज्य पदाधिकारी श्रीम. सुरेखा कदम, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष किशोर कदम,सचिव अमित ठाकूर, बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर, विजय चौकेकर, पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष तथा प्राथ शिक्षक पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष ए. डी. राणे, महा. रा. प्राथ. शिक्षक संघ पदाधिकारी, कास्ट्राईब कल्याण महासंघ जिल्हाध्यक्ष  सचिन जाधव व जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा उपाध्यक्ष राजू वजराटकर तसेच जिल्हाभरातून कदम सरांचे हितचिंतक आणि शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांनी कदम सरांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देऊन त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेऊन गौरवोद्गार काढले. शेवटी राजू वजराटकर यांनी सर्वांचे आभार मानून व सर्वांनी एक मिनिट मौन पाळून कदम सरांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

 

16

4