Tuesday, July 8, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारोटरीमार्फत भरड येथे बसविला दिशादर्शक फलक...

रोटरीमार्फत भरड येथे बसविला दिशादर्शक फलक…

पर्यटकांची गैरसोय दूर झाल्याने समाधान…

 

मालवण, ता. ३० : पर्यटन राजधानी असलेल्या मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळाकडे जाताना वन-वेची माहिती मिळत नसल्याने समस्या भेडसावत होती. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेत भरड येथे दिशादर्शक फलक बसविले.
भरड येथील मुख्य नाक्यावर बसविण्यात आलेल्या या दिशादर्शक फलकाचे उदघाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष अवि नेरकर व बाळू तारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिस कर्मचारी शेखर मुणगेकर, रोटरी क्लबचे सचिव राजेश पारधी, सुहास ओरसकर, महादेव पाटकर, सोनल पालव, पूजा तोडवळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
भरड येथे यापूर्वीही दिशादर्शक फलक बसविले होते. मात्र त्याची उंची कमी असल्याने पर्यटकांना वन-वेची माहिती मिळत नव्हती. परिणामी पर्यटकांची गैरसोय होत होती. शिवाय वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावत होती. त्यामुळे रोटरी क्लबने पुढाकार घेत मुख्य भागात दिशादर्शक फलक बसविण्याचा निर्णय घेतला. दिशादर्शक फलक बसविल्याने आता पर्यटकांची गैरसोय दूर झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments