वेंगुर्लेचे काजू उद्योजक परशुराम वारंग ‘उत्कृष्ट लघु उद्योजक‘ पुरस्काराने सन्मानीत

165
2
Google search engine
Google search engine

मुंबईत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले वितरण

वेंगुर्ले : ता.३०
जिल्हा उद्योग केंद्र, सिधुदुर्ग तर्फे जिल्ह्यातील उद्योजकांना दिला जाणारा ‘उत्कृष्ट लघु उद्योजक जिल्हा पुरस्कार २०१८‘ मे. साईछाया कॅश्यू इंडस्ट्रीजचे संचालक परशुराम वारंग यांना उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुंबई येथे वितरीत करण्यात आला.
जिल्हा उद्योग केंद्र, सिधुदुर्ग तर्फे दरवर्षी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणा-या लघु उद्योजकांना पुरस्काराने सन्मानीत केले जाते. सन २०१८ चा उत्कृष्ट लघु उद्योजक जिल्हा पुरस्कार वेंगुर्ला-भटवाडी येथील ‘मे.साईछाया कॅश्यू इंडस्ट्रीजचे संचालक परशुराम रामचंद्र वारंग यांना जाहीर झाला होता. २७ जून रोजी उद्योग विभाग व वर्ल्ड ट्रेड सेंटर,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्ताने लघुउद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापा-याच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय चर्चासत्र व लघु उद्योग पुरस्कार वितरण सोहळा आयजित केला होता. या कार्यक्रमात श्री. वारंग यांना उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट लघु उद्योजक जिल्हा पुरस्कार २०१८‘ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री अतुल सावे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल श्री. वारंग यांचे उद्योग क्षेत्राबरोबरच विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे