कणकवलीतील सर्व्हीस रोड गेला वाहून

2

ठेकेदाराच्या कामाचा दर्जा उघड

कणकवली, ता.30 ः शहरातील गडनदी पुलाकडे जाणारा तसेच आमदार वैभव नाईक यांच्या निवासास्थानकालगत असलेला सर्व्हीस रोड आज झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. हा सर्व्हीस रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सर्व्हीस रोड वाहून गेल्याने दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराच्या कामाचा दर्जा आणि निकृष्ट दर्जाची नाले, मोर्‍यांची कामेही या पावसात उघड झाली आहेत. काल या सर्व्हीस रोड लगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या शौचालयात पाणी तुंबले होते तर आज त्या भागातील रस्ताच वाहून गेला.
दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील अ‍ॅड.उमेश सावंत यांच्या निवासास्थानक लगत असलेला नाला बंद झाल्याने माजी आमदार विजय सावंत यांच्या निवासस्थानात, हॉटेल मध्ये तीन फुट पाणी गेले होते. याखेरीज सारस्वत बँक आणि एटीएममध्येही पाणी साठले होते. सायंकाळपर्यंत कणकवलीत पावसाचा जोर कायम राहिला आहे.

18

4