वेंगुर्लेत श्री संप्रदाय भक्त सेवामंडळ, वेंगुर्लेचा उपक्रम | राजन तेली यांच्या हस्ते वृक्षारोपण

178
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले, ता. ३०: जगतगुरु रामानंदचार्य श्री.स्वामी नरेंद्रचार्याजी महाराज प्रणीत श्री संप्रदाय भक्त सेवामंडळ , वेंगुर्ले च्या वतीने भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी श्री. तेली यांनी श्री संप्रदायाच्या कार्याबद्दल त्यांच्या कार्याची स्तुती केली.
अनंत श्री विभूषित जग्दगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित श्री संप्रदाय भक्त सेवामंडळ वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने वेंगुर्ला कॅंप पॅव्हेलियन येथे हा वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाला भाजप प्रदेश चिटणीस व माजी आमदार श्री.राजन तेली, भाजप तालुकाध्यक्ष श्री.प्रसंन्ना ऊर्फ  बाळू देसाई, श्री प्रथमेश तेली, श्री संप्रदायाचे  माजी जिल्हासेवाध्यक्ष श्री. संतोष तांडेल, वेंगुर्ला तालुकासेवाध्यक्ष श्री.अंकुश कुबल, ता .महिलाध्यक्ष सौ.संगिता रेडकर, ता.सचिव काशिराम तोरस्कर, ता.सामाजिक उपक्रम प्रमुख श्री.गोविंद खवणेकर, ता.देणगी प्रमुख श्री.जनार्दन तांडेल, ता.प्रसिध्दी प्रमुख श्री शिवा तारी, ता.बटालियन श्री.श्रीकृष्ण उगवेकर, ता.आध्यात्मिक प्रमुख श्री.अनंत गोसावी, ता.धर्मक्षेत्र प्रमुख श्री.चंद्रशेखर राणे, ता.जनगणना प्रमुख श्री.संदेश आसोलकर, ता.युवाप्रमुख श्री.परमानंद करंगुटकर, ता.संजीवनी प्रमुख श्री.विशाल रेडकर, ता.विभागप्रमुख श्री.संभाजी पिंगुळकर, श्री .संजय खोत इ.पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.चंद्रशेखर राणे यांनी केले. श्री.शिवा तारी यांनी संस्थानच्या उपक्रमांची माहिती दिली. भाजप ता.अध्यक्ष बाळू देसाई, भाजप प्रदेश चिटणिस श्री.राजन तेली यांनी श्री संप्रदायाच्या  कार्याबद्दल स्तुती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीरभाऊ मुणगट्टीवार यांनी ३३ कोटी व्रुक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवले आहे ते सर्वांच्या सहभागातुन पुर्ण करुया असे आवाहन केले.  यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.