राष्ट्रवादी व अर्चना फाउंडेशनच्यावतीने वेत्येत नेत्र तपासणी शिबिर

2

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना घारेंचे आयोजन

सावंतवाडी,ता.३०: संसदरत्न खा. सौ. सुप्रीया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे वतीने आणि अर्चना फाऊंडेशनच्या सौजन्याने वेत्ये ता. सावंतवाडी येथे महिलांसाठी नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केक कापुन खा. सुप्रीया सुळे यांचा वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरिक्षक सौ अर्चना घारे – परब तसेच सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांच्या शुभहस्ते महिलांना चष्मे वाटप करण्यात आले. या वेळी योगेश कुबल, वेत्येच्या मा. सरपंच संतोषी गावकर, ग्रा. पं. सदस्या नंदिनी निगुडकर, अस्मिता गावडे, तन्वी गावकर आणि अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सिमरन गावकर यांनी विशेष प्रयत्न केले.

14

4