उशाला वडापाव घेऊन रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ…

2917
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्रकार; त्या व्यवसायिकावर कारवाईची मागणी…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.३०:एरव्ही मुंबई पुण्यातील रेल्वेस्थानकावर दिसणार्‍या घाणेरड्या वडापाव विके्रत्यांचे लोण आता थेट कोकणात पोहोचले आहेत.आज सावंतवाडी येथिल मळगाव रेल्वेस्टेशनवर एक व्यावसायिक आपल्याकडे असलेल्या वडापाव व अन्य साहीत्य उशाला घेवून झोपलेल्या अवस्थेत असलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.दरम्यान अशा प्रकारे उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता प्रवाशांकडुन होत आहे.
अशा प्रकारच्या फोटोवर दिवसभरात सोशल मिडीयावर मात्र नाराजीचे सुर दिसत होते.अलीकडेच मुंबई येथिल एका हॉटेल मध्ये सरबत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाण्यात आंघोळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यानंतर टॉयलेट मधील पाणी घेवून सरबत बनवित असल्याचा दुसरा प्रकार उघड झाला होता.या दोघांची सोशल मिडीयावर पोल-खोल झाल्यानंतर या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती या दोन्ही घटना ताज्या असताना आता सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
यात संबधित वडापाव विक्रेता वडापाव तसेच अन्य खादयपदार्थ उशीला घेवून झोपल्याचे दिसत आहे.त्यामुळे या प्रकाराबाबत भंयकर चिड निर्माण होत असून त्या व्यक्तीचा शोध घेवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

\