सावंतवाडी,ता.३० : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका परीक्षेत कणकवली येथील प्रवीण आशितोष कुबल यांनी ७१.६० टक्के गुणासह प्रथम क्रमांक पटकाविला. कळणे-दोडामार्ग येथील अनुजा अर्जुन परब आणि पणदूर येथील ललितदीप तेरसे यानी ७०.७५ टक्के गुणासह द्वितीय तर सावंतवाडी येथील विनय वाडकर याने ६८.५० टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकाविला.
यशस्वी विद्याथ्याना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, माजी केंद्र संयोजक संदीप तेंडोलकर, येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट,शिवप्रसाद देसाई, डॉ. रुपेश पाटकर, दीपक नेवगी याचे मार्गदर्शन लाभले.
या विद्याथ्याचे श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष दीपक नेवगी, कार्याध्यक्ष प्रवीण बांदेकर, सचिव तथा केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले आहे.श्रीराम वाचन मंदिरात सलग १६ वर्षे वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रम सुरू असून सन २०१९-२० साठी प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे यांनी केले आहे.