वाहतूक काही काळ ठप्प; सायंकाळी उशिरा वाहतूक पूर्ववत
वैभववाडी ता.३०: तालुक्यात सलग तीन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसाने जोरदार मुसंडी मारली. रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने करूळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरा सा. बां. ने वाहतूक पूर्ववत केली.
तालुक्यात सलग तीन दिवस पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने करूळ चेक नाक्यापासून ५. कि. मी. अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.
यावेळी घटनास्थळी उपअभियंता श्री. तावडे, कनिष्ठ अभियंता निलेश सुतार, प्रकाश पवार, शहाबुद्दीन डांगे आदी कर्मचारी घाटात दाखल झाले आहेत. रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सायंकाळी उशिरा वाहतूक पूर्ववत केली.