जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या कट्टा येथे शेतकरी मेळावा

176
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ३० : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३६ वा वर्धापन दिन व कृषिदिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी दुपारी तीन वाजता ओम गणेश साई मंगल कार्यालय, कट्टा येथे शेतकरी मेळावा घेण्यात येत आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते होईल. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, संचालक व्हिक्टर डान्टस, नाबार्डचे जिल्हा महाप्रबंधक अजय थुटे, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे. तरी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँक संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले आहे.