वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने गाईचा मृत्यू ओझर- कातवड येथील घटना…

274
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ३० : तालुक्यातील ओझर कातवड येथे जमिनीवर पडलेल्या वीज भारीत वाहिनीचा स्पर्श होऊन कातवड येथील शेतकरी मंगेश चव्हाण यांची गाय दगावल्याची घटना आज सकाळी घडली. यात श्री. चव्हाण यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ओझर कातवड येथील माळरानावर सकाळी आपल्या गुरांचा कळप चरण्यासाठी मंगेश चव्हाण हे गेले असता कळपातील गुरांमधील एका गाईला जमिनीवर पडलेल्या वीजभारीत वाहिनीचा स्पर्श झाला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच श्री. चव्हाण यांनी तत्काळ वीजवितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. गाय दगावल्याने श्री. चव्हाण यांचे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, पोलिस पाटील शीतल परब, संदीप भोजने, नीलेश परब, कृष्णा चव्हाण, संतोष धुरी, चंद्रकांत धुरी आदी उपस्थित होते.

\