घरगुती गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात… उद्यापासून नवे दर लागू ; इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा निर्णय…

2

नवी दिल्ली, ता. ३० : विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने घेतला आहे. हे नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत.
घरगुती विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर ७३७.५० रुपये प्रति सिलिंडरपर्यंत गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा
मोठा फटका बसत होता. मात्र, आता या १०० दरात रुपयांची कपात झाल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच आता अनुदानित सिलिंडरचा दर ४९४.३६ रुपये केला आहे. याबाबतची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

15

4