सावंतवाडी शहरातील पाणी पातळी वाढण्यासाठी शोष खड्ड्यांचा पर्याय

2

नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन : शासकीय व खासगी जमिनीत राबविणार मोहिम

सावंतवाडी, ता. १ : पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा सावंतवाडीत आज नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नरेंद्र डोंगरावर तब्बल 36 शोष खड्डे मारून ही मोहिम सुरू करण्यात आली. आता शहरात अन्य ठिकाणीसुद्धा ही मोहिम राबविण्यात येणार आहे, असे श्री. साळगावकर यांच्याकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पातळी कायम रहावी यासाठी महिन्याभरापूर्वी नगराध्यक्ष साळगावकर यांच्याकडून शहरात शासकीय जमिनीत शोष खड्डे तसेच पाणी अडविण्यासाठी आवश्यक असलेली उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक शुभांगी सुकी, आनंद नेवगी, परिमल नाईक, दिपाली भालेकर, आशिष सुभेदार, गजानन परब, डुमिंग अल्मेडा, दिपक म्हापसेकर, विनोद काष्टे आदी उपस्थित होते.

0

4