कृती समितीच्या पदाधिकार्यांकडून पोष्ट मास्तरांकडे सुपूर्द
सावंतवाडी, ता. १ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कृती समितीच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांना सुमारे 8 हजार पत्रे पाठविण्यात आली.
यावेळी कृती समितीच्या पदाधिकार्यांसह सर्वपक्षीयांनी या उपक्रमाला जोरदार पाठिंबा दर्शविला.
दरम्यान शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सुरू झालेल्या या अभियानाला सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शवा असे आवाहन यावेळी उपस्थित कृती समितीच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष श्याम सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, परिमल नाईक, लक्ष्मण नाईक, आनंद मेस्त्री, शिवप्रसाद देसाई, दिपक गावकर आदी उपस्थित होते.