वेंगुर्ले परबवाडा येथील दाडाचेटेम्ब तलावात मगरीचे दर्शन

418
2

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वेंगुर्ले, ता.१ : वेंगुर्ले परबवडा येथील दाडाचेटेम्ब तलावात सुमारे ५ फूट लांब मगर दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
परबवाडा येथील या तलावात गेल्या १५ दिवसांपासुन अचानक ही मगर दिसू लागली आहे. अनेक ग्रामस्थांनी तीला पाहिले आहे. हा तलाव भर वस्तीला लागूनच असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच पपू परब यांनी वनविभागाकडे केली आहे. दरम्यान वनविभागानेही नागरिकांच्या जीवितास या मगरीमुळे असलेला धोका लक्षात घेऊन तात्काळ या मागरीला पकडून तिचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

4