रिंगेवाडी येथे भरली भात शेती शाळा

2

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा उपक्रम

वैभववाडी, ता.०१:  भुईबावडा-रिंगेवाडी येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान तसेच किड व रोग संरक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय,वैभववाडी यांच्या मार्फत भात पिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कृषी सहाय्यक चंद्रकांत इंगळे यांनी जमीन आरोग्यपत्रिका नुसार भात पिकामध्ये करावयाचे खत व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक एकनाथ राठोड यांनी श्री पद्धत सुधारीत भात लागवड पद्धत विषयी मार्गदर्शन केले. तसेच रविवारी रिंगेवाडी येथील सखाराम देसाई यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड केली.
यावेळी कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी अमोल आगवान यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत असून रिंगेवाडी येथील बचत गटाच्या महिला यामध्ये उस्फूर्त पणे सहभागी होत आहेत.

10

4