विनयभंगाच्या आरोपातून शिक्षकाची निर्दोष मुक्तता

2

कणकवली, ता. 1 ः विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तत्कालीन हेळेवाडी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक चिंतामणी पवार (रा. नरवडे) याची येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
याकामी अ‍ॅड. अनील निरवडेकर यांनी काम पाहिले. हा गुन्हा फेब्रुवारी 2017 मध्ये शाळेत घडला होता. त्या ठिकाणी विद्यादान करत असलेल्या शिक्षक पवार याने पाचवीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याच्यावर बालकाचे लैगिंक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याकामी एकूण 71 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे त्याची सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

12

4