आंबोलीत वीजवाहिन्या तुटून पडल्याने स्फोट…

294
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रात्रीची घटना ः जीर्ण वाहिन्या बदलण्याची ग्रामस्थांची मागणी

आंबोली, ता. 01 ः येथील गावठणवाडी परिसरात विज पुरवठा करणार्‍या मुख्य वाहिन्या तुटून पडल्याचा प्रकार काल घडला. त्यानंतर मोठ्या स्फोटचा आवाज आला. परिसरातील काही घरातील इलेक्ट्रीक वस्तूंचे यात नुकसान झाले आहे.
की घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. वर्षा पर्यटन सुरू असताना असा प्रकार घडल्याने विज मंडळाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. जीर्ण झालेल्या या विजवाहिन्या तात्काळ बदलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. वारंवार त्या बदलण्याच्या सुचना विज कंपनीच्या कर्मचार्‍यांना देण्यात आल्या होत्या. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्या ठिकाणी ग्रामस्थांची, जनावरांची ये-जा असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी लोकांची मागणी लक्षात घेता तात्काळ या वाहिन्या बदलण्यात याव्यात, अन्यथा अपघात झाल्यास विज अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

\