कोल्हापूर मराठा समाजाच्या वतीने नारायण राणे,चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कार…

584
2

कोल्हापूर ता.०१; मराठा आरक्षण मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय कोल्हापूर येथील मराठा समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आला आहे.आज याबाबतची बैठक झाली.
यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून या दोघांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजी राजे आभार मानणार आहे.

4