मुंबई झाली ‘जलमय’.!

2

रेल्वे वाहतूक विस्कळीत; रेल्वे पकडण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी

मुंबई/अजित जाधव ता.०१:राज्यात सलग दोन दिवस धुवाधार कोसळणा-या पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीत मुंबई सायन येथे रेल्वे स्थानकात पाणी घुसल्याने तब्बल एक तास रेल्वे उशिरा धावत आहेत. रेल्वे पकडण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. दरम्यान रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ ठळला.
रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. ठिकठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. दरम्यान सायन रेल्वे स्थानकात पाणी घुसल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सायन स्थानकात उशिरा आलेल्या लोकलमुळे महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईसह अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, चर्चगेट, अशा पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे.

56

4