सिंधुदुर्ग, ता.१ : सिंधुदुर्गात गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्ले-सातंडी आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पात १०० टक्के पाणी साठा झाला आहे. या दोन धरणांतून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर आंबोली, सनमटेंब व पावशी लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणी साठा झाला आहे. इतर धरणांमध्येही पाणीसाठा चांगला पाणीसाठा होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागावतीने आज देण्यात आली. कोर्ले – सातंडी मध्यम प्रकल्पात २५.५६४० द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. तर माडखोल लघू पाटबंधारे प्रकल्पात १.६९०० द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.
सिंधुदुर्गातील प्रकल्पनिहाय झालेला पाणी साठा पुढील प्रमाणे असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. कंसातील आकडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे असून सर्व आकडे मिली मीटर परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्प १२६.०२७० (६४.२०), देवघर – ३२.६६७० (८९), लघू पाटबंधारे प्रकल्प – शिवडाव – १.०७३६ (१७४), नाधवडे – १.४९१९ (१६०), ओटाव – १.६०७८ (१६०), देंदोनवाडी – १.००४० (१७४), तरंदळे – ०.२७५० (१६२), आडेली – ०.३८६० (निरंक), आंबोली – १.१२०० (१९५), चोरगेवाडी- ०.९६७०(निरंक), हातेरी – १.११७० (निरंक), निळेली – ०.६७०० (निरंक), ओरोस बुद्रुक – ०.०८०) (निरंक), सनमटेंब- १.४४४० (१५७), तळेवाडी डिगस, – ०.३८०० (निरंक), दाभाचीवाडी – ०.५९१० (निरंक), पावशी – १.८२९० (१७५), शिरवल – ६०७० (निरंक), पुळास – ०.४७७० (निरंक), वाफोली – ०.३६६० (निरंक), कारिवडे – ०.२०१० (निरंक), धामापूर – १.१९१० (निरंक), हरकूळ – १.३८४० (75), ओसरगाव – ०.०७९० (निरंक), ओझरम – ०.३५३० (निरंक), पोईप – १.१६३० (निरंक), शिरगाव – ०.०६१० (१४०), तिथवली – ०.४५७० (१२०), लोरे – १.४१०० (निरंक).
कोर्ले-सातंडी,माडखोल धरणे “ओव्हर फ्लो’
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES