मदर क्विन्स स्कुलचे आयोजन : पंचम खेमराज कॉलेज सभागृहात होणार स्पर्धा
सावंतवाडी, ता. 01 : येथील सि. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कुलतर्फे राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्या स्मरणार्थ 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा श्री पंचम खेमराज कॉलेज सभागृहात होणार आहे.
स्पर्धेसाठी राजमाता सत्वशिलादेवी भोसले ः एक आदर्श व्यक्तीमत्व असा विषय असून स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे 10 जुलैपर्यंत मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडी कार्यालयात द्यावीत. यानंतर येणारी नावे स्विकारली जाणार नाहीत. स्पर्धेत मोठ्या गटासाठी 1200 रु., 1000 रु., 700 रु. व छोट्या गटासाठी 1000 रु., 800 रु., 500 रु. तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण 18 जुलैला सकाळी करण्यात येईल. स्पर्धकांनी शाळेचे ओळखपत्र व आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक गटातून एका शाळेतील जास्तीत जास्त 2 विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी 9404779941, 02363-271155 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.