Home Blog Page 2
वैभववाडी,ता.२६: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत उद्या ता. २७ ला सकाळी ११ वाजता खरीप हंगाम लागवड तंत्रज्ञान जिल्हा अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये कोकणात होणाऱ्या पारंपरिक भात बियाण्यांचे प्रदर्शन व शेतकऱ्यांना पारंपरिक भात बियाणे विषयी माहिती एग्रीकार्ड कंपनीचे तज्ञ मार्गदर्शक सचिन चोरगे हे करणार आहेत. तसेच पाणलोट अंतर्गत स्थापित गटांना प्रकल्प उपसंचालक...
ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा; अर्चना घारे यांनी दिली भेट, सहकार्याचे आश्वासन... दोडामार्ग,ता.२६: येथील आंबेली-माणगावकरवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी गेले पाच दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने हा परिसर पूर्णपणे अंधारात आहे. याबाबतची माहीती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी या ठिकाणाला भेट दिली.यावेळी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की, आजही पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा...
सावंतवाडी रुग्णालयातील घटना; संबंधित महिलेवर कारवाई करा, देव्या सुर्याजी... सावंतवाडी,ता.२६: येथील उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रक्ताचा तुटवडा असताना त्या ठिकाणी रक्तदान करण्यास गेलेल्या रक्तदात्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या संबंधित महिला कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी...
माणगावातील प्रकार; ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाच्या विरोधात नाराजी... कुडाळ,ता.२६: माणगाव-मळावाडी येथे असलेल्या एका व्यवसायिकांने ग्रामपंचायत रस्तावरच अतिक्रमण केल्याचा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी त्याने आपले अनधिकृतपणे मंगल कार्यालय थाटले आहे. याबाबतची तक्रार येथील स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेली २५ वर्षे हा रस्ता रहदारीसाठी वापरला जात आहे. या रस्त्यावर डांबरीकरणासाठी...
मुंबई,ता.२६: सोन्याच्या दरात प्रति तोळा २ हजार २०० रूपयाची घट झाली आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेत पहिल्यांदाच सोने उतरले आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा दर प्रतितोळा ७४ हजार ५०० रूपया पर्यंत गेला होता. त्यामुळे सर्वसामान्यांचे तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आता सोन्याच्या दरात घट होताना दिसत आहे. यात ७४ हजार ५०० वरून आज ७१ हजार ८०० वर हा दर...
सावंतवाडी,ता.२६: येथील मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती प्राध्यापक केदार म्हसकर यांनी दिली. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. संबंधित मृतदेह नेमका कोणाचा? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.
ग्रामस्थ आक्रमक; भरपाई न दिल्यास मृतदेह सावंतवाडीच्या कार्यालया समोर ठेवणार... बांदा,ता.२६: महिलेच्या अंगावर वीज वाहिनी तुटून पडल्यामुळे "ती" जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुंभारदेवणे परिसरात घडली. विद्या वामन बिले (वय ६०) असे तिचे नाव आहे. त्या परिसरातील ओहळात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकाराबाबत बांदा येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत...
नागरिक नाराज, अन्यथा एकही बिल भरणार नाही; एकनाथ नाडकर्णीचा इशारा... दोडामार्ग,ता.२५: इन्सुली सबस्टेशन वरून दोडामार्ग तालुक्याला वीज पुरविणाऱ्या सर्व वीज वाहिन्या अंडरग्राउंड करा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे. शिवाय हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी न लागल्यास तालुक्यातून एकही विजेचे बिल भरले जाणार नाही. प्रसंगी महावितरण व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा त्यांनी...
दीपक केसरकर; बाबी रेडकर यांची भेट, वेंगुर्ल्यातील मच्छीमारांशी चर्चा... वेंगुर्ले,ता.२५: येथील समुद्रात झालेल्या होडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या "त्या" ४ ही खलाशांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाँच चालक बाबी रेडकर यांच्या निवासस्थानी श्री. केसरकर यांनी भेट दिली. यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या पाठिशी आपण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वादळी...
सावंतवाडी,ता.२५: कुडाळच्या दिशेने गुरांचे खाद्य घेऊन जाणारा बाॅलेरो पिकप टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला, ही घटना आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आकेरी घाटी परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु टेम्पो रस्त्याच्या शेजारील गटारात कोसळल्याने टेम्पोचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच टेम्पोतून नेण्यात येत असलेले गुरांचे खाद्य रस्त्यावर सांडले आहे.