Home Blog Page 3
किशोर तावडे; सिंधुदुर्गात मतदार वाढल्याने २५ मतदान केंद्राचा प्रस्ताव... ओरोस,ता.२५: विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे, मात्र अद्यापही पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी २८ मे ही शेवटची तारीख आहे. अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.दरम्यान जिल्ह्यातील १७...
सावंतवाडी,ता.२५: दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे ला जाहीर होणार आहे. शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
विशाल परबांच्या माध्यमातून उभारणी; इंदुरीकर महाराजांची खास उपस्थिती... सावंतवाडी,ता.२५: येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून चराठा येथे त्यांच्या निवासस्थानी परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगळवार दिनांक २८ मेला दुपारी बारा वाजता होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे...
खराब हवामानामुळे लॅन्डिंग रद्द; मुंबईतून प्रवासी घेऊन आलेले विमान माघारी... सिंधुदुर्ग,ता.२५: मुंबई विमानतळावरून शनिवारी नियोजित वेळेत टेक ऑफ घेऊन सिंधुदुर्ग ( चिपी ) विमानतळावर १२:४५ वाजता लॅन्डिंग होणारे विमान सिंधुदुर्ग हद्दीत येवून घिरट्या घालून माघारी परतले. खराब हवामानामुळे विमान लॅन्डिंग करण्याकरिता अडचण येवू लागल्याने ते विमान परत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे विमान सेवा सुरू...
कणकवली,ता.२५: कणकवली शहरासह लगतच्या कलमठ, वागदे, जानवली, हळवल या गावांच्या परिसरात छोट्या विमानाची गस्त सुरू होती. पाच ते दहा मिनिटांच्या फरकाने हे विमान घिरट्या घालत असल्‍याने शहर तसेच तालुक्‍यातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती. वेंगुर्लेतील बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हे विमान आले असल्‍याचीही चर्चा होती. मात्र जिल्‍हा प्रशासनाने ही शक्‍यता फेटाळून लावली. दरम्‍यान सातत्‍याने हे छोटे विमान शहर आणि लगतच्या गावांवरून...
ग्रामस्थ आक्रमक; वीज अधिकाऱ्यांना विचारणार जाब... बांदा,ता.२५: महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुली गावात गेले ३ दिवस वीज पुरवठा गायब आहे. महावितरणचे सब स्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा इन्सुली वासीयांना काळोखात रहावे लागत असेल तर इतर गावांचा वीजपुरवठा कसा सुरळीत करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तर याबाबतचा जाब वीज वितरणला विचारणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.याबाबत सहाय्यक अभियंता अनिल यादव...
वेंगुर्ले होडी दुर्घटना प्रकरण; काल सापडले होते दोन मृतदेह... वेंगुर्ले,ता.२५: होडी उलटून समुद्रात बुडालेल्या अन्य दोन खलाशांचे मृतदेह आज अखेर सापडले, तर यातील दोघांचे मृतदेह काल सापडले होते. त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. याबाबतची माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यातून देण्यात आली. आझान मुनिलाल कोल ( वय १८ ) याचा मृतदेह पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सागरेश्वर समुद्रकिनारी आढळून आला आहे. तर...
सावंतवाडी,ता.२५: मारहाण प्रकरणी कास येथील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. नागेश भाईप व विशांत भाईप अशी त्यांची नावे आहेत. २९ मार्चला फिर्यादी तेजस्विनी भाईप यांच्या घरासमोर दोघांनी आपसात संगनमत करून जमीन मोजणीच्या वेळी लावलेला निस उचलला होता. या कारणावरून झालेल्या वादानंतर मारहाण केली होती. तसेच फिर्यादी हिला शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात...
अर्चना घारेंचे महिलांना आश्वासन; आरोंदा येथील प्रकल्पाला भेट... सावंतवाडी,ता.२५: महिलांनी निर्माण केलेल्या काजू उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांनी जिजाऊ काजू प्रक्रिया उदयोग समुहाच्या महिला सदस्यांना दिली. सौ.घारे यांनी आरोंदा येथील काजू प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील महिलांशी संवाद साधला.आरोंदा येथे नऊ प्रभाग संघांनी मिळून...
सावंतवाडी,ता.२५: महाराष्ट्र राज्यात नीट, जेईई, तसेच एमएच सीईटी या सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अग्रगण्य समजली जाणारी पुणे येथील ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट, आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने उद्या ता. २६ ला सकाळी १० वाजता येथील मिलाग्रीस हायस्कूल येथे एक दिवशीय करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यां व्यक्तीचा उचित...