Home Blog Page 3928
बाबू सावंतांचा आरोप; पुन्हा प्रकार घडल्यास गप्प बसणार नाही... सावंतवाडी ता.०७: माजगाव येथील नळपाणी योजनेत दिड कोटीचा अपहार झाला आहे. मात्र हा प्रकार लपवण्यासाठी एक अधिकारी मला भेटण्यासाठी आला होता.'सेटिंग'चा प्रयत्न केला परंतु असा प्रकार पुन्हा झाल्यास आपण खपवून घेणार नाही,असा इशारा पंचायत समितीच्या सभेत सदस्य बाबू सावंत यांनी आज येथे दिला आहे. कारीवडे येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.त्यामुळे...
सावंतवाडी मोती तलावातील घटना ; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन... सावंतवाडी ता.०७: येथील मोती तलावात आढळून आलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्यापर्यंत पटली नाही. ही घटना आज सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. दरम्यान येथील नागरिक पप्पू राऊळ, नगरपालिका कर्मचारी मोहन कांबळे,सावंतवाडी पोलीस हवालदार रमाकांत दळवी व मयूराज कमतनूरे यांनी हा मृतदेह तलावा बाहेर काढला आहे.या मृतदेहांची ओळख पटवण्याचे...
सावंतवाडी, ता. 06 : येथील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले अनील पाटील यांची मिरज येथे बदली झाली आहे. आज त्यांनी आपला कार्यभार स्विकारला. श्री. पाटील हे ऑक्टोबर 2013 मध्ये सावंतवाडीत दाखल झाले होते. त्यांच्याकडे सावंतवाडी तालुक्याची जबाबदारी होती. त्याकाळात त्यांनी विविध विकासकामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले.
संजय पाचपोर : जिल्ह्यातील संस्थांशी साधला संवाद सिंधुदुर्गनगरी,ता. ०६ : सिंधुदुर्गात फळप्रक्रिया व भात खरेदी नोव्हेंबर मध्ये सुरु करण्याचा प्रयत्न सहकार भारती संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील सहकाराला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपली संघटना प्रयत्न करणार आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत...
कारवाईची मागणी : पंचायत समिती बैठकीत सदस्य घाडीगावकर, परुळेकर आक्रमक मालवण, ता. ६ : सीआरझेड विभागाची परवानगी मिळाली नसताना तालुक्यातील वराड-सोनवडेपार पुलाचे भूमीपुजन करणारे अधिकारी अडचणीत आले आहेत. त्या पुलासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी आज येथील पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य सुनील घाडीगावकर व राजू परुळेकर यांनी दिली. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधार्‍यांकडून जनतेची फसवणूक केली...
पाच पर्यटक सुदैवाने बचावले : काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप वेंगुर्ले, ता. 06 : येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून रेडी यशवंतगड समुद्रकिनार्‍याच्या परीसरात उभारण्यात आलेले चार सिमेंटचे खांब पहिल्याच पावसात कोसळले. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने त्या ठिकाणाहून जाणारे पाच पर्यटक बालंबाल बचावले. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला असून याची चौकशी करण्याची मागणी...
अद्याप तारीख जाहिर नाही : शिक्षक व पालक मात्र संभ्रमात सावंतवाडी, ता. 06 : दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहिर होणार आहे, असे मॅसेज सोशल मिडीयावर येत असल्याने या मॅसेजवरून शिक्षक व पालक हैराण झाले. मात्र अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही तारीख जाहिर करण्यात आलेली नाही असे राज्याच्या माध्यमिक शालांत परीक्षा विभागाकडून जाहिर करण्यात आले. गेले काही दिवस सोशल मिडीयावर आज दहावीचा निकाल आहे...
नुतनीकरणाचे काम लवकरच : नगराध्यक्ष गिरप वेंगुर्ले, ता. ६ : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जलतरण तलावाची सध्या दुरावस्था झाली असून या तलावात पोहण्यास येणाऱ्या नागरीक व मुलांना येथील तुटलेल्या फरशा लागून दुखापत होत आहे. असे बरेच प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आले आहेत. असा आरोप नगरसेवक विधाता सावंत व शितल आंगचेकर यांनी करून तात्काळ कार्यवाहीची मागणी आजच्या न. प. सर्वसाधारण सभेत केली. याबाबत...
सावंतवाडी, ता. 06 : मळेवाड येथे सावळ आणि काळोजी या दोन कुटुंबियात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या चौघा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कृष्णा काळोजी, निळकंठ काळोजी, विष्णू काळोजी व अजित काळोजी अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना 3 जून रोजी अटक करण्यात आली होती. या दोन कुटुंबियात वाद...
ठेकेदाराकडून गटार खोदाई, नाले सफाईची कामे सुरू कणकवली, ता.6 : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक हायवेचे काम बंद पाडण्यासाठी आज रस्त्यावर उतरले. मात्र हायवे ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी आजपासूनच चौपदरीकरणाचे काम बंद ठेवून शहरातील कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यानंतर चौपदरीकरण बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. तर सायंकाळ पर्यंत शहरातील गटार खुदाई, पाणी निचरा होण्याची व्यवस्था, सर्व्हीस...