Home Blog Page 3971
मागणी पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या सत्काराचा प्रयत्न दोडामार्ग ता.१९: येथील नागरिकांना सक्शन मशीन सेवा देण्यास अपयशी ठरलेल्या मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचा सत्कार करून अनोखे आंदोलन करण्याचा प्रयत्न आज तेथील माजी नगराध्यक्ष संतोष नानचे,नगरसेवक व महाराष्ट्र स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी केला.परंतु येत्या दहा दिवसात तांत्रिक अडचणी दूर करून आपण सेवा पुरवू असे आश्वासन श्री.इंगळे यांनी दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली.यावेळी अशा पद्धतीने माझा...
आबा कोंडस्कर; राजन तेलींनी फुकाचे श्रेय घेऊ नये... वेंगुर्ले ता.१९: तालुक्यातील दाभोली-वेतोरे रस्ता हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.त्यामुळे राजन तेली यांनी खोटी माहिती सांगून जनतेची दिशाभूल करू नये अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांनी केली. या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे तेलींच्या आंदोलनाची गरज नाही.असेही त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उघड टीका...
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या चौपदरी महामार्गामूळे मोठ्या संख्येने वृक्षतोड झाली आहे.त्यामुळे वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील निसर्गप्रेमींनी एकत्र येत.मुंबई गोवा महामार्गावर ३०० रोपांची लागवड केली. यावेळी सागर नाणोसकर, नितीन गोलटकर, प्रसाद गावडे, ओंकर सावंत, सिद्धेश परब, साई आजगावकर, मुन्ना आजगावकर, अनिकेत धुरी, रूपेश वंजारी, हेमंत राजेभोसले, बापू भोगटे आदी उपस्थित होते. या उपक्रमात जास्तीस जास्त निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन...
ठिकठिकाणी झालीत पाण्याची तळी :  कुडाळ नवीन बसस्थानकासमोर व्होल्वो रूतली कणकवली, ता.19 ः महामार्ग ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या नियोजनशून्य कामामुळे मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. कुडाळच्या नवीन बस स्थानकासमोरील बॉक्सेलजवळ व्होल्वो बस रुतून बसली होती. तर कणकवलीत कोर्टासमोरील महामार्गावर तलाव निर्माण झाला होता. याखेरीज ठिकठिकाणचे रस्ते निसरडे आणि खड्डेमय झाल्याने अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागले. सिंधुदुर्गात आजपासून मान्सून सक्रीय...
वेंगुर्ले ता. १९; आेरोस येथील जलतरण तलावात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ५० मी.फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा प्रकारात तुळस काजरमळी येथील जलतरणपटू तुषार परब याने प्रथम क्रमांक मिळवत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सदरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.आेरोस येथे भाई सावंत यांच्या हस्ते तुषार याला प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल देऊन सन्मानीत...
गावातील अन्य शाळांनाही काॅम्पूटर देणार : कुडाळकर वेंगुर्ले : ता. १९ तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत च्या १४ व्या वित्त आयोग निधी मधून पूर्ण प्राथमिक शाळा खुटवळ व पूर्ण प्राथमिक शाळा जांभरमळा या दोन्ही शाळांना काॅम्पूटर उपलब्ध करून भेट देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या दोन्ही शाळांना संगणक उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकां मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आधुनिक...
खेड, ता.१९ :तालुक्यातील बोरज गावाजवळ मुंबई - गोवा महामार्गावर सकाळी साडे दहाच्या सुमारास धावत्या मोटारीमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर मोटारीला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाजाने बोरज गाव हादरले इतकी त्याची तीव्रता होती. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यत मोटार पूर्णपणे जळून...
सिंधुदुर्गनगरी ता.१९: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ११.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जून २०१९ पासून आता पर्यंत १६०.३७ मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ३४ (१९७), सावंतवाडी ०३ (११८), वेंगुर्ला ०१ (१३२), कुडाळ ०९ (१९४), मालवण...
राजन भोसले यांचा गौप्यस्फोट:लोकसभेत वाढलेली मते आमचीच सिंधुदुर्गनगरी ता.१९: लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा स्वगृही परतण्यासाठी खूप प्रयत्न केले.असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी आज येथे केला.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मिळालेली मते ही काँग्रेसची आहेत.राणेंनी काँग्रेस सोडली हे अनेकांना कळले नाही त्यामुळे त्यांच्या मतात वाढ झाली.ही वस्तुस्थिती आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार राणे काँग्रेसचे...
राजन भोसले; लोकसभेचा पराभव विसरून कार्यकर्ते कामाला लागले सिंधुदुर्गनगरी ता.१९:लोकसभेला आम्ही कमी पडल्याने आमचा पराभव झाला. मात्र, हा पराभव विसरून व त्यावेळच्या चुका सुधारून आम्ही विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री भोसले यांच्यासह...