Tuesday, December 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामळगाव हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये रंगला "केक मिक्सिंग" सोहळा...

मळगाव हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये रंगला “केक मिक्सिंग” सोहळा…

युवराज लखमराजेंची उपस्थिती; माई इन्स्टिट्यूटच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक…

 

सावंतवाडी,ता.२२: नाताळ सणाच्या पाश्र्वभूमीवर मळगाव येथील माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या महाविद्यालयात आज “केक मिक्सिंगचा” सोहळा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा प्रमुख उपस्थित पार पडला.

यावेळी अशा प्रकारचे उपक्रम हे विदेशात राबवले जातात. यात सिंधुदुर्गातील हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. आज महाविद्यालयाच्या प्रांगणात हा उपक्रम पार पडला. यावेळी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करीअर करणाऱ्या सावंतवाडीतील युवकांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले लोकमान्य ट्रस्टच्या संचालिका. सौ.सई ठाकूर बिजलानी.इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य श्री अनिरुद्ध दास. मिलाग्रीस हायस्कूलचे फादर रिचर्ड सालदाना,लोकमान्य ट्रस्ट चे प्रवीण प्रभू केळुसकर., दत्तात्रेय मिसाळ, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगावचे प्राचार्य अमेय महाजन. लोकमान्य ट्रस्टचे संचालक तरुण भारतचे वितरण प्रमुख सचिन मांजरेकर. तरुण भारत चे डेक्स इन्चार्ज अवधूत पोइपकर. आधी लोकमान्य ट्रस्ट व माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल व जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगावचे प्राध्यापक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी युवराज पुढे म्हणाले. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये असे आगळे वेगळे उपक्रम राबवण्याची कल्पना उत्तम आहे. माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजने हा नावीन्य पूर्ण उपक्रम राबवला आहे. खरंतर मोठ्या हॉटेल्स मध्ये असे मिक्सिंग केक बनवले जातात आणि त्याचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळाले. खरंतर येथील मुलांना असे प्रात्यक्षिक आणि वेगळं ट्रॅडिशन साजरे करण्याची संधी मिळाली याचं खरंच कौतुक आहे, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ. सई ठाकूर बिजलानी म्हणाल्या माइ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट एक वेगवेगळे उपक्रम राबवत आहे . जेणेकरून मोठ्या तारांकित हॉटेल्सच्या धर्तीवर येथे विद्यार्थ्यांना वेगवेगळे ट्रॅडिशनल साजरे करता यावेत आणि या माध्यमातून नवीन काहीतरी शिकता यावे. या दृष्टीने हे उपक्रम राबवले जात आहेत. खरंतर हा केक मिक्सिंग ट्रॅडिशनल उपक्रम या जिल्ह्याला निश्चितपणे वेगळेपण देईल. यातून वेगवेगळे काहीतरी करता येतं याची प्रचिती येथील हॉटेल मॅनेजमेंट मधील विद्यार्थ्यांना अनुभवता येण्यासारखी आहे. नाताळ सणाच्या शुभेच्छा ही त्यांनी दिल्या. असे विविध उपक्रम हॉटेल मॅनेजमेंट च्या माध्यमातून राबवले जातील. पर्यटन जिल्ह्याला हॉटेल इंडस्ट्रीज हा महत्त्वाचा पाया आहे आणि त्या दृष्टीने आम्ही उपक्रम राबवणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी युवराजनी श्रद्धा राजे भोसले यांनी खरंतर. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. हॉटेल इंडस्ट्रीज या भागात येणे महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टीने पाहून लोकमान्य ट्रस्ट टाकत आहे हॉस्पिटॅलिटी वाढणे गरजेचे आहे आणि ते काम  वेगवेगळे उपक्रम राबवून एक नाविन्यपूर्ण असे काम केले जात आहे. असे ते म्हणाल्या. यावेळी फादर रिचर्ड सालदाना यांनी खरंतर छोट्याशा या भागात नाताळ सणानिमित्त मेरी मिक्सिंग केकसेरेमनी उत्सव साजरा करून एक वेगळेपण दाखवून दिले आहे. याबद्दल या ट्रस्टचे मी मनापासून आभार मानतो. असे हे केक मिक्सिंग सोहळा म्हणजे एक नवीन ऊर्जा देणार आहे आणि नवीन काहीतरी येथील लोकांना अनुभवता येण्यासारखे आहे असे उपक्रम राबवत जावे त्याला आमचे सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडी शहरातील शेफ वर्धन पोकळे, प्रसन्न कोदे, अव्दैत नेवगी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र संयोजक तुषार वेंगुर्लेकर, तरुण भारत चे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर, ओंकार कलामंच अध्यक्ष व पत्रकार अमोल टेंबकर आदींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments