सावंतवाडी,ता.०९: श्री एकमुखी दत्त मंदिर आणि वासुदेवानंद सरस्वती मंदिर, सबनीसवाडा येथे उद्या गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी ७ वाजत एकमुखी दत्त पूजा, एकादशमी आणि लघु रुद्र, ९ वाजता श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची आरती, १ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ७ वाजता नामस्मरण आणि आरती, रात्री ८ वाजता: स्थानिक भजनाचा आदी कार्यक्रम होणार आहेत. श्री दत्तमंदिर आणि वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने सर्व भाविक भक्तांना या कार्यक्रमात उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा आणि उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.