नितेश राणे; “ओव्हर फ्लो”चा धोका टाळण्यासाठी तलावांचे सर्वेक्षण करणार…
- सावंतवाडी,ता.२४: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात सह मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना आज इथे झालेल्या बैठकीत राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. दरम्यान राज्यातील काही तलावात “ओव्हर फ्लो”चा धोका टाळण्यासाठी तलावांत मधील गाळ काढण्यात येणार आहे. त्या दृष्टीने अहवाल सादर करा, अशा सूचना राणे यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण होऊन मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून नुकसानीची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राज्यातील सर्व तलावांचे सर्वेक्षण करून गाळ किती साचला आहे, याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस पदुमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.