वन विभागाच्या रेस्क्यू टीमचा पुढाकार; घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी…
सावंतवाडी,ता.२४: कोलगाव-काजरकोंड येथील ओढ्यात वास्तव्यास असलेल्या मगरीला पकडण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सापळा रचला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. मोती तलावात असलेली मगर पकडण्यासाठी या रेस्क्यू टीमला यश मिळाले होते. त्यानंतर आता कोलगाव येथील मगर ते पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
येथील आयटीआय च्या परिसरात असलेल्या ओढ्यामध्ये ही मगर वास्तव्यास आहे. अनेकांच्या ती नजरेस पडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ही मगर लवकरात-लवकर पकडण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासून त्या ठिकाणी वनविभागाचे रेस्क्यू पथक दाखल झाले होते. त्या ठिकाणी मगर पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. त्या पिंजऱ्यामध्ये मगर येण्यासाठी कोंबडीचे पिल्लू ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती तेथील सामाजिक युवा कार्यकर्ते परेश बावकर यांनी दिली. या रेस्क्यू टीम मध्ये आधी पथकाचे सदस्य सहभागी झाले आहेत.