Tuesday, October 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीशेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

आचरा येथे आयोजन ; ७० शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण…

आचरा,ता.२७: ठाकरेसेनेचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांच्या पुढाकारातू कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण, ठाकरेसेना आचरा विभाग आणि शेतकरी विकास मंच आचरा पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

आचरा येथील लौकिक सांस्कृतिक भवन येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन आचरा माजी सरपंच श्याम घाडी व आचरा विभाग संघटक पप्पू परुळेकर यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे पशू वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. केशव देसाई यांनी प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी किर्लोस येथेही शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र भेट घेत प्रत्यक्ष शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायचे प्रशिक्षण घेतले. यावेळी ब्रिगेडियर डॉ. सुधीर सावंत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले.

 

शिबिरात प्रामुख्याने कोकणात पाळण्यात उपयुक्त शेळ्यांच्या जाती व उत्पादकता, शेळ्यांचे आजार, उपचार व लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन, शेळ्यांसाठी घर बांधणी व शेळी घरासाठी जागेची निवड, शेळीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च, शेळ्यांसाठी चारा व वृक्ष लागवड यावर सखोल मार्गदर्शन तर कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिरात परसबागेत पाळण्यात उपयुक्त कोंबड्याच्या जाती व उत्पादकता, कोंबड्यांचे आजार, उपचार व लसीकरण प्रात्यक्षिकांसह, खाद्य व पाणी व्यवस्थापन, कोंबडी घर बांधणी व कोंबडी घरासाठी जागेची निवड, पोल्ट्री फार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

शिबिरात ४५ शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन तर २५ शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, आचरा मच्छीमार नेते नारायण कुबल, माजी सरपंच मंगेश टेमकर, रामेश्वर पतसंस्थेचे संचालक श्रीकांत बागवे, वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, जगदीश पांगे यांचे मार्गदर्शन लाभले. समारोपप्रसंगी विभागप्रमुख समीर लब्दे, संघटक मंगेश टेमकर, सचिन रेडकर, परेश तारी , नारायण कुबल आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे सूत्रसंचालन रोहन कदम यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments