निलेश राणे; माणगाव खोऱ्यातील हजारो ठाकरे सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेत…
कुडाळ,ता.२७: माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली. माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे गुरुवारी माणगाव खोऱ्यातील उपवडे, वसोली, दुकानवाड, मोरे , वाडोस, कांदोळी, महादेवाचे केरवडे निळेली आधी गावातील ठाकरे सेना प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारोच्या संख्येने कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे यांचे सोबत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे,संदीप कुडतरकर, संजय पडते , बाळू कुबल, प्राजक्ता शिरवलकर, सौ खोचरे, मथुरा राऊळ, दीपक पाटकर, रत्नाकर जोशी, दिनेश साळगावकर, दीपक नारकर, विनायक राणे, दिनेश वारंग, दत्ता कोरगावकर, दिनेश शिंदे, सचिन धुरी,आदी उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त प्रक्ष प्रवेश माणगाव खोऱ्यात होत असून याचे सर्व श्रेय जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना जाते. त्यामुळेच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दत्ता सामंत यांच्यासारखा जिल्हाप्रमुख कुठे मी बघितला नाही. त्यांनी मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे साथ दिली आहे. संघटना मोठी झाली पाहिजे यासाठी नेहमी झटणारे आणि अनेक विकास कामाचा धडाका लावलारे जिल्हाप्रमुख असून त्या पूर्ण करण्याचा शब्द मी पडू देणार नाही. त्यांचा प्रत्यक शब्द पूर्ण करणार आहे. गेल्या दहा वर्षात माणगाव खोऱ्यातील वाडी रस्ते, मुख्य रस्ते आधी कामाबाबत माणगाव खोरे पिछाडीवर आहे. यासाठी कुठल्याही विकास कामात माणगाव खोऱ्यातील लोकांना न्याय देणार आहे. माणगाव खोऱ्यातील ७० लाखाची विकास कामे डी.पी.डी.सी च्या माध्यमातून झाली असून प्रस्तावित चार कोटी रुपये, १३ कोटीचे पूल ,तसेच वीज वितरण सब स्टेशनसाठी डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात विषय अग्रक्रमाने मांडून त्यासाठी 13 कोटीची तरतूद करावी लागणार असल्याचे सांगितले.
आज आमच्या शिवसेनेत येणाऱ्यांना आम्ही परके न समजता ते कुटुंबातिलच आहेत. तुमच्या सर्व विकासकामांना अग्रक्रम देणार असून अंजीवडे घाट रस्त्याचा डीपीआर बनवत असून घोडगे सोनवडे घाट रस्ता असे मिळून दोन्ही घाट रस्त्याचा शुभारंभ लवकरात लवकर थाटामाटात संपन्न करू असे सांगितले. तसेच आकारिपड जमीन प्रश्नबाबत सतराशे साठ लाभार्थ्यांना जमिनी मिळण्याबाबत कॅबिनेट मंत्री बावनकुळे व राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी पाठपुरावा केला आहे. त्याप्रमाणे तीन महिन्यात याबाबत लाभार्थ्यांना जमिनी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. तसेच वनविभागाच्या ताब्यात असलेल्या आकारिपड जमिनीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
यावेळी प्रवेशकर्ते ऊबाठागटाचे विभाग प्रमुख रामचंद्र धुरी, दीपक नारकर, बाळू कुबल,संजय पडते, संदीप कुडतरकर, संजय आग्रे यांनी आपल्या भाषणात आमदार कसा असावा असे सांगताना निलेश राणे यांच्या पहिल्याच अधिवेशनातील मुद्देसूद भाषणाबाबत माहिती दिली.
यावेळी विभाग प्रमुख मोरे रामचंद्र धुरी, माजी उपसरपंच यशवंत धूरी, शाखाप्रमुख कैतन फेराव, माजी उपसरपंच अंकुश धुरी, रामचंद्र धुरी, महेश धुरी ,लहू धुरी प्रकाश धुरी ,काशीराम खरोडे ,कृष्णा दळवी, पदु डोईफोडे युवा सेनाप्रमुख विशाल धुरी,बापू डोईफोडे,अरुण सावंत, विठ्ठल जाधव,जयराम डोईफोडे रुपेश रेमूळकर, रमेश खरात, रामचंद्र धुरी ग्रामपंचायत सदस्य असून सौ ममता धुरी, उपविभाग प्रमुख प्रशांत माडगूळ, शाखाप्रमुख किरण म्हाडगुत,दीपक म्हाडगुत, प्रदीप म्हाडगुत, भागोजी वरक, बाबा खरात, संग्राम थोकते, विठू वरक, कांदुळी येथील कृष्णा साटम, रवी साटम ,रमेश साटम, सूर्यकांत पवार ,विठ्ठल सावंत मोहन सावंत, सुरेश सावंत, रमेश सावंत ,निळेली येथीलपिंटू रेगडे, सुरेश परब, कांता परब, मुला जंगले ,अनंत कोकरे ,नितेश परब विकी परब ,राजन धुरी,अशोक परब ,सदू रेडगे ,बलराम रेडगे, तुकाराम रेडगे , मंगेश रेडगे भाई पालकर उपवडे येथील सदानंद गवस, महादेव राऊत ,कृष्णा गवस, राजाराम राऊत, दशरथ राऊळ, गोपाळ सावंत ,मोहन धुरी मंगेश निकम ,महादेवाचे खेरवडे येथील भास्कर केरवडेकर ,नरेंद्र वेंगुर्लेकर, शंभू घाडी,सुदेश राणे ,संतोष केरवडेकर ,विद्या केरवडेकर सरस्वती केरवडेकर ,कृष्णा परब निलेश परब, निधी परब, सोनू कोठेकर ,सुनील राणे यासह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपस्थित प्रवेशकर्त्यांचे निलेश राणे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कोरगावकर ,प्रस्ताविक दिलीप सावंत यांनी केले.