वेंगुर्ले,ता.०८: येथील नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज २० नगरसेवक पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीत एकूण २० जागांपैकी १० जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. सदस्य संख्या वाढल्यामुळे अनेक नवीन इच्छुकांना आता संधी मिळणार असल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे.
सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक सोडत नियंत्रण अधिकारी आरती देसाई यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी हा आरक्षण सोडत कार्यक्रम घेतला. शाळकरी मुलीच्या हातून चिठ्ठी काढून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे: प्रभाग एक
(अ) : नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला) (ब) सर्वसाधारण, प्रभाग दोन (अ) : सर्वसाधारण (महिला)
(ब) सर्वसाधारण, प्रभाग तीन
(अ) : नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग
(ब) : सर्वसाधारण (महिला), प्रभाग चार (अ) : सर्वसाधारण (महिला)
(ब) : सर्वसाधारण, प्रभाग पाच
(अ) : सर्वसाधारण (महिला)
(ब) : सर्वसाधारण, प्रभाग सहा
(अ) : सर्वसाधारण (महिला)
(ब) : सर्वसाधारण, प्रभाग सात
(अ) : नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला) (ब) : सर्वसाधारण, प्रभाग आठ (अ) : नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला) (ब) : सर्वसाधारण, प्रभाग नऊ (अ) : अनुसूचित जाती
(ब) : सर्वसाधारण (महिला) प्रभाग दहा (अ) : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ब) : सर्वसाधारण (महिला)
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या या आरक्षण सोडत कार्यक्रमा वेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच सुहास गवंडळकर, तुषार सापळे, अभिषेक वेंगुर्लेकर, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, प्रणव वायंगणकर, नितीन कुबल, ॲड. श्रद्धा बाविस्कर, नंदन वेंगुर्लेकर, सुहास कोळसुलकर, पंकज शिरसाट, भूषण आंगचेकर, पिंटू सावंत, भूषण सारंग, वसंत तांडेल, दादा सोकटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या आरक्षण सोडती वेळी वेंगुर्ले नगरपरिषदेचे अभि गिरप, प्रथमेश कडुलकर, मंदार चौकेकर, संगीता कुबल, संदीप परुळेकर यांनी काम पाहिले.
दरम्यान या आरक्षणावर कोणाच्या हरकती असल्यास त्यांनी मंगळवार १४ ऑक्टोंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी हेमंत किरकर यांनी केले आहे.