राजू बेग, भारती मोरेंचा पत्ता कट; अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार…
सावंतवाडी,ता.०८: येथील नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया आज जाहीर करण्यात आली. यात नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला तर पाच प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यातील तीन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. या सर्व आरक्षण प्रक्रियेत विद्यमान नगरसेवक राजू बेग आणि भारती मोरे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता त्यांना अन्य मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे तर बऱ्याच ठिकाणी सर्वसाधारण खुला, असे आरक्षण पडल्यामुळे अजय गोंधावळे, प्रतिक बांदेकर, दिलीप भालेकर आदी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
यावेळी झालेले आरक्षण प्रक्रिया पुढीलप्रमाणे: यात प्रभाग 1 – अ (ना.म.प्र.महिला), ब. (सर्वसाधारण खुला), प्रभाग 2- अ. (ना.म.प्र. महिला), ब. (सर्वसाधारण खुला) प्रभाग 3- अ. (सर्वसाधारण महिला) ब. (सर्वसाधारण खुला), प्रभाग 4 – अ. (सर्वसाधारण महिला) ब ( ना.म.प्र सर्वसाधारण)
प्रभाग 5 – अ. (सर्व. महिला), ब (सर्वसाधारण खुला) प्रभाग 6- अ. (सर्वसाधारण महिला )ब. (सर्वसाधारण खुला) प्रभाग 7 – अ. (सर्वसाधारण महिला )ब.( सर्वसाधारण खुला) प्रभाग 8- अ. (सर्वसाधारण महिला) ब. (ना.म. प्र. सर्वसाधारण) प्रभाग 9 – (अ. ना.म. प्र. महिला) ब. (सर्वसाधारण खुला), प्रभाग 10 – अ. (सर्वसाधारण महिला) ब. (अनुसूचित जाती ) साठी या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
यावेळी उत्कर्ष आधारित चैतन्य राऊत, राशी वेल्हाळ, जान्हवी करमळकर या लहान मुलांच्या हस्ते ही आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी संजू परब, अजय गोंदावले, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, उमाकांत वारंग, राजू बेग , संजू शिरोडकर, प्रसाद अरविंदेकर, कुणाल सावंत, परीक्षित मांजरेकर,समीर वंजारी, आनंद नेवगी, गीता सुकी, अर्चित पोकळे, हेमंत बांदेकर, भिकाजी धोंड, सुधीर आडिवरेकर, बंड्या कोरगावकर, गौरव जाधव, प्रशांत साटेलकर, अनिल केसरकर, निशांत तोरस्कर, अनिल सावंत, राजू कासकर, समीरा खलील, विराग मडकईकर, वीरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, परिमल नाईक, सुकन्या टोपले, साईनाथ जामदार, अल्ताफ मुल्ला आदी उपस्थित होते.