Wednesday, October 8, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदार यादी प्रसिद्ध. ..

कुडाळ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदार यादी प्रसिद्ध. ..

कुडाळ,ता.०८: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कुडाळ तहसीलदार यांच्या कार्यालयातून याबाबतची अधिकृत जाहिर सूचना जारी करण्यात आली. ही प्राथमिक मतदार यादी कुडाळ तहसील कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पाहणीसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदचे ९ गट व पंचायत समितीच्या १८ गणामधील मतदार यादीवरील नावांबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास ते लेखी स्वरूपात दाखल करण्यासाठी ८ ऑक्टोबरपासून १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. संबंधितांनी निर्धारित नमुन्यात आपले अर्ज तहसीलदार कुडाळ यांच्याकडे सादर करावेत, असे सूचित करण्यात आले आहे. या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा अर्जांची दखल घेतली जाणार नाही, असे कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments