सावंतवाडी,ता.०८: मळेवाड-भटवाडी येथे एस.टी. बसला धडक दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात संशयित डंपर चालक भरत सुरेश कुबल यांची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितातर्फे ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ जुलै २०२२ ला सकाळी सुमारे ७:१५ वाजता मळेवाड-भटवाडी येथे ही घटना घडली होती. मळेवाडकडून येणाऱ्या डंपर चालकाने एस.टी. महामंडळाच्या बसला धडक दिल्याची फिर्याद दत्ताराम सावळ यांनी दिली होती. या फिर्यादीनुसार संशयित भरत कुबल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित कुबल यांच्यातर्फे ॲड. भांबुरे यांनी युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद आणि सरकारी पक्षाकडे सबळ पुराव्यांचा अभाव लक्षात घेऊन, सावंतवाडी न्यायालयाने संशयित कुबल यांची काल निर्दोष मुक्तता केली.