बांदा,ता.०९: येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्या वतीने नरक चतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे. रविवार १९ ऑक्टोबरला ही स्पर्धा पिंपळेश्वर मंदिर, जवळ, बांदा येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली असून प्रथम क्रमांकास १५,०००, तर द्वितीय क्रमांकास १०,००० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच बांदा मर्यादित स्पर्धे अंतर्गत प्रथम क्रमांक ४,४४४ आणि द्वितीय क्रमांक २,२२२ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात दिवाळी स्पेशल लकी ड्रॉ चेही आयोजन करण्यात आले असून त्यात प्रथम पारितोषिक – रेफ्रिजरेटर, द्वितीय पारितोषिक – कूलर, तृतीय पारितोषिक – इलेक्ट्रिक गिझर ठेवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे येथील स्थानिक कलाकार प्रशांत सावंत हे विविध स्टॅच्यू साकारणार आहेत. अधिक माहितीसाठी आशीष सावंत (मो. 7058322706) गौरांग साळगावकर (मो. 7058559216), देवेश वारंग (मो. 7057568486) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.